किल्ले धारूर येथे कै.मधुकरभाऊ धस यांच्या स्मृतीत रक्तदान शिबिर

किल्ले धारूर, दि. 3 डिसेंबर: दिलासा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते कै. मधुकरभाऊ धस यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त किल्ले धारूर युथ क्लबतर्फे दि. ३ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर धारूर बस स्थानकाच्या आवारात आयोजित करण्यात आले असून, शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मधुकरभाऊ धस यांनी किल्ले धारूर शहरातील तलावाच्या खोलिकरणासाठी विशेष योगदान दिले होते. दुष्काळाच्या काळात त्यांनी युथ क्लबच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याचे मोठे सामाजिक कार्य हाती घेतले होते. त्यांच्या अकस्मात निधनाने शहरास एक महान सामाजिक कार्यकर्ता गमावावा लागला.
त्यांच्या स्मृतीत युथ क्लब दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करत असतो. या वर्षीच्या शिबिरामध्ये आगर प्रमुख नवनाथ चौरे, पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे आणि डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष मयूर सावंत हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हे रक्तदान शिबिर केवळ एक कार्यक्रम नसून, सामाजिक बांधिलकीची जाणीव जपण्याचे एक माध्यम आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण रक्तदान करून गरजूंना मदत करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *