हसनाबाद-राज्यमार्ग 232 रस्ता अडवून शेतकऱ्यांनी केला आंदोलन; प्रशासनाकडे दुर्लक्ष, तहसील कार्यालयात उपोषण सुरू

 

 

धारूर, ता. २९ नोव्हेंबर: हसनाबाद ते राज्यमार्ग क्रमांक 232 दरम्यानचा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवल्याने या परिसरातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करत हसनाबादचे ग्रामस्थ दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांना निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे निराश झालेल्या ग्रामस्थांनी आज सकाळपासून तहसील कार्यालयात उपोषणाला बसले आहेत.

या उपोषणामुळे तहसील कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. अद्यापपर्यंत प्रशासनाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी या ग्रामस्थांना भेटण्यासाठी आलेला नाही. यामुळे ग्रामस्थांचा संताप वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *