हसनाबाद-राज्य मार्ग 232 रस्ता अडवून शेतकरी, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

धारूर: हसनाबाद येथील नागरिकांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या हसनाबाद ते राज्य मार्ग क्र. 232 या डांबरी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी करत धारूर तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.
काही शेतकऱ्यांनी या रस्त्याचे काम जाणूनबुजून अडवले असल्याने हा महत्त्वाचा प्रकल्प रखडला आहे. यामुळे हसनाबादचे नागरिक वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जात आहेत.
90% काम पूर्ण, शेतकऱ्यांमुळे अडचण
हा रस्ता हसनाबाद ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सुमारे 90% काम पूर्ण झाले असून, उर्वरित 10% काम काही शेतकऱ्यांमुळे अडवले गेले आहे. यामुळे हा रस्ता पूर्ण होण्यास विलंब होत आहे.
नागरिकांची आंदोलनाची चेतावनी
जर दोन दिवसांत या प्रश्नाचे निराकरण झाले नाही तर हसनाबादचे नागरिक कुटुंबासह व जनावरांसहित धारूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना उपस्थित राहिलेले नागरिक:
नवनाथ नखाते, रमेश नखाते, मोतीराम लांडगे, सचिन नखाते, सत्यवान नखाते, अंगद नखाते, शिवाजी सोळंके, परमेश्वर कोठुळे, दत्ता नखाते यांच्यासह हसनाबाद येथील असंख्य नागरिक निवेदन देताना उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *