आ.प्रकाश दादा सोळंके यांचा विजय होताच कार्यकर्त्यांनी वाटली दादांच्या वजनाइतकी साखर
माजलगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही अटीतटीची झाली आहे या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. प्रकाश सुंदरराव सोळंके यांचा विजय झाला आहे व या विजया बद्दल सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे श्री.गणेश सौंदर यांनी व अंजनडोह येथील सरपंच प्रमोद सोळंके यांनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन माजलगाव मतदार संघाचे भाग्यविधाते व लोकप्रिय आ.प्रकाश दादा सुंदरराव सोळंके यांच्या वजना एवडी साखर म्हणजेच एक क्विंटल पाच किलो साखर वाटली आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच हिरहिरीने सहभागी होणारे व सामाजिक कार्यासह राजकीय क्षेत्रात ही आपले नाव असणारे श्री गणेश सौंदर यांनी प्रकाश दादा सुंदरराव सोळंके हे आमदार व्हावेत अशी मनोकामना आई तुळजाभवानीच्या चरणी व्यक्त केली होती ती मनोकामना पूर्ण झाल्याने श्री.गणेश सौंदर व त्यांचे जिवलग मित्र सामाजिक कार्यात सतत सहभागी असणारे अंजनडोह चे सरपंच प्रमोद सोळंके यांनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन आपली मनोकामना पूर्ण झाल्याने त्यांनी दि 26 रोजी तुळजापूर येथे जाऊन आई तुळजा भवानी चरणी नतमस्तक होऊन एक क्विंटल पाच किलो साखर वाटप केली. त्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.यावेळी त्यांच्या सोबत अंजनडोह येथील त्यांचा मित्र परिवार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.