सोनीमोहा येथे धूमधामात साजरा झाला संविधान दिन
धारूर, दिनांक 26 नोव्हेंबर: आंबेवडगाव केंद्र सोनीमोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज संविधान दिनाची साजरी मोठ्या उत्साहात करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्रीराम सिकची सर, शिक्षक वृंद, प्रमुख पाहुणे दत्ताजी भोसले व राधाकिसन तोंडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादरीकरण केले. या कार्यक्रमात मुख्याध्यापक श्रीराम सिकची सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि आपल्या अधिकारां बद्दल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे दत्ताजी भोसले व राधाकिसन तोंडे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीसाठी काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात संविधानाच्या प्रतीला पुष्पहार अर्पण करून त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की, ते संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर देशहितार्थ करतील.