राजमाता जिजाऊ महाविद्यालयात संविधान दिन उत्सात साजरा
किल्लेधारूर, 26 नोव्हेंबर: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजमाता जिजाऊ महाविद्यालयात आज भारतीय संविधान दिनाची साजरी मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन केले.
या कार्यक्रमात राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नागोराव वाघमारे यांनी भारताच्या संविधानाची निर्मिती आणि त्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. त्यांनी संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांबद्दल विस्तृत माहिती दिली. वाघमारे सर यांनी आपल्या भाषणात संविधानाची पालन करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, प्रभारी कार्यालय अधीक्षक श्री. केशव भोंडवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनायक कापावार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजयकुमार कुंभारे, कार्यक्रमाधिकारी प्रा. बालासाहेब जोगदंड, कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. बी. जाधव, सर्व विभागाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.