राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन
राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन
किल्लेधारूर – १९ नोव्हेंबर
राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्ताने प्रा. विनायक कापावार यांनी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांना शपथ दिली. याप्रसंगी उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, प्रभारी कार्यालय अधीक्षक श्री. केशव भोंडवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनायक कापावार तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.