विधानसभा निवडणुकांसाठी धारुरमध्ये पोलिसांचा रुट मार्च

विधानसभा निवडणुकांसाठी धारुरमध्ये पोलिसांचा रुट मार्च

शांतता व निर्भयतेच्या वातावरणात मतदान प्रक्रियेसाठी पोलीस दलाने घेतली व्यापक तयारी.

किल्ले धारूर दिनांक 17/11/2024 रोजी, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धारुर शहरात पोलीस अधिक्षक श्री. अविनाशजी बारगळ, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री. कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली एक रुट मार्च घेण्यात आला. हा रुट मार्च बाजरतळ अहिल्यादेवी नगर, विरपांडुरंग चौक, फुले नगर, साठे नगर, कसबा विभाग आणि इतर भागांतून पार करण्यात आला. या रुट मार्चमध्ये BSF चे 02 अधिकारी, 30 अंमलदार, पोलीस ठाणे धारुरचे 01 अधिकारी, 15 पोलीस अंमलदार व 37 होमगार्ड हजर होते.

या मोहिमेतून पुलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क निर्भयतेने बजवावा, मतदान बुथ परिसरात 100 मीटरच्या आत मोबाईल घेऊन जाऊ नये, आणि सर्व नागरिकांनी लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी आपला योगदान द्यावे. बीड जिल्हा पोलीस दलाने शांततापूर्ण व निर्भयतेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तयारी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *