माजलगाव विधानसभा मतदारसंघात मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ जोरदार डोअर टू डोअर फेरी
माजलगाव विधानसभा मतदारसंघात मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ जोरदार डोअर टू डोअर फेरी
माजलगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ एक जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी धारूर शहरातील गायकवाड गल्ली, कुंभार गल्ली, जोडआड गल्ली, डोंगर वेस, अशोक नगर आणि हनुमान गल्ली यासारख्या भागांत डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला.
युवक कार्यकर्त्यांनी मतदारांशी सविस्तर चर्चा करीत महाविकास आघाडीचा उमेदवार किती साधा, सरळ आणि सक्षम आहे याबद्दल माहिती दिली. मतदारांना आगामी 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर मतदान करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.
या प्रचार फेरीत युवा नेते संजय फावडे, सुनील कावळे, सचिन घोडके, अक्षय गै, शेख फकीर, सुभाष भोसले, महारुद्र शिंदे, रुपेश अवताडे, शंतनु मिसाळ, अभिनव फावडे, सातिराम जेधे, आणि रोहन जेधे यांच्यासह अनेक सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
युवांच्या स्फूर्तीदायी सहभागाने या प्रचाराची जोरदार गती मिळाली असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रचार महत्त्वपूर्ण ठरेल.