डॉ. स्वरूपसिंह हजारी यांचा प्रकाश सोळंके यांच्या विजयासाठी कटिबद्धता
डॉ.स्वरूपसिंह हजारी यांचा प्रकाश सोळंके यांच्या विजयासाठी कटिबद्धता
अनुचित माहिती आले तरी विश्वास ठेवू नका, असे आवाहन :- डॉ. हजारी
माजलगाव विधानसभा मतदारसंघात माजलगाव, वडवणी आणि धारूर या तिन्ही तालुक्यात आ. प्रकाश सोळंके यांच्या मोठ्या प्रमाणावर विकासकामांची कामगिरी आहे. त्यामुळे धारूर तालुक्यातून आमदार करण्यासाठी मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन धारूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी दिले.
आ. प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थ धारूर शहर आणि तालुका परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर बैठकीत बोलताना डॉ. हजारी म्हणाले की, “मागील अनेक वर्षांपासून सोळंके कुटूंबीय स्थानिक लोकांच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी विविध विकासकामे केली असून सिंचनाचे मोठे प्रकल्प मार्गी लावण्याचे कार्य आ. सोळंके यांनी यशस्वीपणे केले आहे.”
डॉ. हजारी मतदारांना आवाहन केले की, “सुज्ञ मतदारांनी कोणत्याही अपक्ष अथवा इतर पक्षांच्या उमेदवारांना मत देऊन वेळ वाया घालवू नये. दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आ. प्रकाश सोळंके यांना विजयी करा. कोणत्याही अफवांना बळी न पडता, जात-धर्माच्या भेदाभेद न करता प्रामाणिकपणे प्रकाशदादांच्या सोबत रहा.”
तसेच, आगामी दोन-तीन दिवसांत कोणतीही अनुचित माहिती आले तरी त्यात विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. “आ. प्रकाश सोळंकांना धारूर तालुक्यासह ग्रामीण भागातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार आहे,” असे डॉ. हजारी यावेळी स्पष्ट केले.
या कॉर्नर बैठकीत धारूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.