मतदार जागा: लोकशाहीचा आवाज योग्य लोकप्रतिनिधीची निवड
मतदार जागा: लोकशाहीचा आवाज
योग्य लोकप्रतिनिधीची निवड
प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला आता चांगल्या लोकप्रतिनिधीची निवड करण्याची महत्त्वाची वेळ आली आहे. आमच्या मतदार संघाचा विकास कोण करेल, हे विचारात घेऊन लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे. निवडलेल्या उमेदवाराच्या कामाचे मूल्यमापन करताना त्याने किती कामे केली, त्याच्या सामर्थ्याचे आणि श्रीमंतपणाचे प्रमाण न पाहता, आपल्याला पहायला हवे की त्याने आपल्या गावाचा आणि गोरगरीब जनतेचा विकास कसा केला आहे.
विकासाची निवड करताना लक्षात घ्या:
– उमेदवाराने गावातील मूलभूत समस्या जसे की रस्ते, पाणी, आणि वीज यावर किती लक्ष दिले?
– तो गरिबांच्या अडचणींवर कृतीशील होता का?
– त्याने आपल्या क्षेत्रासाठी किती कष्ट घेतले?
– अति महत्त्वाचे कामात किती प्राधान्य दिले?
– गावासंबंधीत विविध कामे?
मतदाता म्हणून, आम्हाला एक सक्षम, सर्वगुणसंपन्न आणि चरित्र संपन्न लोकप्रतिनिधीची गरज आहे. तो रात्रंदिवस काम आणणारा असावा.
हे काम अवघड असेल, पण जितके महत्वाचे आहे, तितकेच गंभीर. जसे आपण मुलीच्या वरात चांगल्या गुणांची पाहणी करतो, तसाच प्रयत्न आपल्याला एक योग्य लोकप्रतिनिधी शोधण्यासाठी करावा लागेल. अन्यथा, पाच वर्षे आपल्या मतदार संघाचा विकास बंद पडेल. सेल्फी आणि लाल दिव्याची गाडी न पाहता, योग्य आणि सक्षम व्यक्तीला मत द्या.