धारूरमध्ये माधव तात्या निर्मळ यांची जाहीर सभा, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन : – नगरसेवक राजुशेठ कोमटवार
धारूरमध्ये माधव तात्या निर्मळ यांची जाहीर सभा, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन : – नगरसेवक राजुशेठ कोमटवार
माजलगाव मतदार संघाचे अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांच्यासाठी आपल्या मतदानाचा हक बजविण्याचे आवाहन
उद्या धारूर शहरामध्ये माजलगाव मतदार संघाचे अपक्ष उमेदवार माधव तात्या निर्मळ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:00 वाजता वार सोमवार शिवाजी महाराज व्यापारी संकुल ( मिट्टू वटा ) येथे सभेत माजी समाज कल्याण सभापती कल्याण भाऊ आबुज, ज्येष्ठ भाजप नेते ईश्वर अप्पा खुर्पे, लालासाहेब तिडके, बाळासाहेब सोनटक्के बाबासाहेब बडे,श्रीधर बडे, हनुमंत मुंडे, महादेव केकान, भगवान कांदे, जयदेव तिडके, माणिक मुरकुटे, राजाभाऊ सत्वधर, शिवाजी केंद्रे, श्रीधर बडे,श्रीहारी आण्णा बडे रामचंद्र शेवते, संतोष नागरगोजे, बबनराव सरवदे, तुकाराम महाराज तिडके, शिवाजी अप्पा मुंडे, ईश्वर अप्पा खुर्पे, कल्याणराव शेप बाळासाहेब क्षिरसागरआणि अनेक अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेत प्रतिष्ठित नेत्यांचा समावेश असून, नगरसेवक राजुशेठ कोमटवार यांनी नागरिकांना या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
राजुशेठ कोमटवार यांनी माधव निर्मळ यांचे कौतुक करताना म्हटले आहे की, “धारूर मतदार संघाच्या विकासासाठी आपला मतदान माधव निर्मळ यांच्या कुकर या चिन्हावर द्या. माधव निर्मळ एक लोकांमध्ये मिसळणारा आमदार, म्हणूनच आपण सर्वांनी त्यांना एकत्रितपणे समर्थन करणे आवश्यक आहे.”
समाजातील जनतेने मोठा प्रतिसाद दिला आहे आणि माधव निर्मळ यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांकडून मतदानाच्या उत्साही समर्थनाची अपेक्षा आहे.
तुमचं मतदान हे तुमच्या हक्काचं प्रतिनिधीत्व करते याचे महत्त्व लक्षात ठेवून, आपण आजच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या उमेदवाराला समर्थन देण्याचा संकल्प करूया.
धारूरच्या विकासासाठी आपल्या हक्काचा आमदार मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन माधव निर्मळ यांना पाठिंबा द्यावा, असे आपण सर्वांना आवाहन नगरसेवक राजुशेठ कोमटवार करीत आहोत.