अपक्ष उमेदवार प्रा.ईश्वर मुंडे यांचा मोहनदादा जगताप यांना पाठींबा

अपक्ष उमेदवार प्रा.ईश्वर मुंडे यांचा मोहनदादा जगताप यांना पाठींबा

 

समाजकारण व राजकारणात खा.शरदचंद्र पवार यांच्या वर निष्ठा ठेवून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणाऱ्या प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे यांनी राष्ट्रवादी कॅांग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडे माजलगाव विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी मागीतली होती.
पक्षाने उमेदवारी दिली नाही या नाराजीतून समर्थकांच्या दबावामुळे प्रा.ईश्वर मुंडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
परंतू खा.शरदचंद्र पवार यांच्या वरील निष्ठा व आ.जयंत पाटील यांचे मार्गदर्शन,या निवडणूकीतील महा विकास आघाडीचा जनतेच्या हिताचा जाहीरनामा पाहून सर्व समर्थक हितचिंतकांची नाराजी दूर करून अपक्ष उमेदवार प्रा.ईश्वर मुंडे यांनी महा संसदरत्न खा.सुप्रीयाताई सुळे यांच्या माजलगाव येथील प्रचार सभेत खा.बजरंग बप्पा सोनवणे,माजी आ.सौ.उषाताई दराडे यांच्या उपस्थितीत माजलगाव विधानसभा मतदार संघात महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहनदादा जगताप यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रा.ईश्वर मुंडे यांचे शैक्षणिक, सामाजीक क्षेत्रातील कार्य व सर्व समाज घटकांतील लोकांना सोबत घेऊन चालण्याच्या स्वभावामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.याचा नक्कीच फायदा मोहनदादा जगताप यांना होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *