सुनील कावळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; शेकडो युवकांचा पाठिंबा
धारूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील कावळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीरपणे प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी देशाचे नेते शरद पवार, महाराष्ट्राचे युवा नेते रोहित पवार, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांच्यावर विश्वास ठेवला.
सुनील कावळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांनी मोहन जगताप यांच्या पक्ष कार्यालयात उपस्थित राहून आपला पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे जगताप यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अर्जुन गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब खामकर, युवा नेते अजय जगताप, सुरेश बप्पा शेळके, बिबीशन गायकवाड, राजु शिदे, रामदास तिडके, सचिन घोडके, अतिश शुक्ला यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनील कावळे यांच्या या प्रवेशाने महाविकास आघाडीला आणखी मजबूती मिळणार असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा होणार आहे.