महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांच्या विजयासाठी शरद पवारांची भव्य जाहीर सभा १७ नोव्हेंबरला माजलगावमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन! : – माजी नगराध्यक्ष अर्जुन गायकवाड
माजलगाव – महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोहनराव जगताप यांना जोरदार समर्थन देण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वात भव्य जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता माजलगाव शहरातील मंगलनाथ मैदानावर होणार आहे.
या सभेसाठी धारूर शहर आणि धारूर तालुक्यातील नागरिकांनो मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी केले आहे.
शरद पवार यांना बीड जिल्ह्यात विशेषतः माजलगाव तालुक्यात मानणारा एक मोठा वर्ग आहे. यापूर्वी पवार यांनी बीड जिल्ह्यात केज, परळी आणि बीड येथे तीन सभा घेतल्या आहेत. आता प्रचाराच्या तिसऱ्या व अंतिम टप्यात, मोहन जगताप यांच्या विजयासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेली ही सभा निश्चितच प्रभावी ठरेल, असे गायकवाड यांनी सांगितले. “आपण सर्वांनी एकत्र येऊन या सभेला मोठा प्रतिसाद द्यावा, हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे ते पुढे म्हणाले.