किल्ले धारुर शहरातील माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह मुस्लिम समाजाने रमेशरावजी आडसकर यांना दिला जाहिर पाठिंबा

माजलगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना किल्ले धारुर शहरातील मुस्लिम समाजाने अपक्ष उमेदवार रमेशरावजी आडसकर यांना जोरदार पाठिंबा दिला आहे. किल्ले धारुर शहरातील माजी उपनगराध्यक्ष आवेज भाई कुरेशी, माजी नगरसेवक हारुण सर, आणि माजी नगरसेवक बाबु भाई शेख यांच्यासह हजारो मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला.

दुधाळा गल्लीत आयोजित केलेल्या काॅर्नर बैठकीत रमेशरावजी आडसकर यांना जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला. या बैठकीत केज नगर पंचायतचे गटनेते हारुण भाई इनामदार यांनी मुस्लिम बांधवांना मतदान करण्याचे आवाहन केले. हारुण सर यांनी सांगितले की, शहरातील अनेक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आमदार महोदयांना सहकार्य केले, परंतु आमच्या मागण्यांना महत्व न देता धारुर शहराच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी कोणताही विशेष प्रयत्न करण्यात आलेला नाही.

आडसकर यांनी शहरातील विकासासाठी विशेषतः घाट रस्ता रुंदीकरण, शादी खाना, भव्य दिव्य रुग्णालय, सार्वजनिक शौचालय, कब्रस्तान, कुंडलिका पाणी पुरवठा आणि शहरातील रस्ते व नाल्यांच्या विकासाच्या योजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे, आडस गावांसह इतर गावांचा समावेश करीत धारुर शहरातील व्यापार वाढविण्यासाठी अनेक वर्षापासून असलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी व अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष पुढाकार घेणार असा शब्द दिला.

या काॅर्नर बैठकीला उपस्थित असलेल्या मुस्लिम समुदायातील प्रमुख व्यक्तींमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक मंजुर कुरेशी, मुजमिल खुरेशी, हबीब भाई शेख, शेख खलील, शेख मोमीन, सय्यद अलीम, शाहरुख मोमीन, नूर भाई, जमिल पठाण, मुक्तारज्ञ शेख, मुनिवर सय्यद, रियाज सय्यद, शाहिल शेख, आणि आदिम शेख यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *