युवा नेता ऋषिकेश आडसकर यांचा प्रचार: धारूर शहरात विजयाची लहर तरुणाईचे समर्थन आणि विकासाबाबत चर्चा, रमेशराव आडसकर यांच्या विजयी होण्याची अपेक्षा अधिक वाढली!
धारूर शहरात आज युवा नेता ऋषिकेश आडसकर यांनी विविध ठिकाणी गाठीभेटी घेत रमेशराव आडसकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांना अनेक तरुणांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून, तरुणाई ऋषिकेश आडसकर यांच्यासोबत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
ऋषिकेश भैया आडसकर यांनी आज धारूर शहरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतला आणि तरुणांशी विकासाबाबत चर्चा केली. आडसकर कुटुंबीयांना झालेल्या दगा फटका बाबत त्यांनी दुःख व्यक्त केले, मात्र यामध्ये सर्व तरुण आणि जनता त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
माजलगाव मतदार संघात रमेशराव आडसकर यांच्या प्रती सहानुभूतीची एक जबरदस्त लाट आहे, आणि या लाटावर स्वार होऊन ते माजलगाव विधानसभेचा गड पार करेल असा विश्वास नव मतदारांनी व्यक्त केला आहे.
युवा नेते ऋषिकेश आडसकर यांच्या या प्रचारामुळे धारूर शहरात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे आडसकर कुटुंबीयांच्या विजयी होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.