धारूर शहर आणि धारूर तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन दादा जगताप यांना मतांची मोठी वाढ मिळवून देणार : – सुरेश बप्पा शेळके
धारूर: माजलगाव विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांचा प्रचार जोरदार सुरू आहे, आणि धारूर शहरात त्यांच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत मोहन जगताप यांना विजयी करण्यासाठी राज मुद्रा सामाजिक संघटनेने सक्रिय सहभाग घेतला आहे.
राज मुद्रा संघटनेचे मार्गदर्शक सुरेश बप्पा शेळके आणि त्यांच्या सर्व पदाधिकार्यांनी रात्री-दिवस मेहनत घेतली आहे. धारूरचा आणि तालुक्याचा संपूर्ण विकास साधण्यासाठी त्यांनी प्रत्येक मतदाराशी संवाद साधत महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनराव जगताप यांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे ठरवले आहे.
सुरेश बप्पा शेळके म्हणतात, “आपल्याला धारूरचे ऐतिहासिक वैभव मिळवायचे असेल, तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांना मत देणे अत्यंत आवश्यक आहे.” त्यांच्या या आवाहनास लोकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.
राज मुद्रा संघटनेच्या अपार मेहनतीमुळे धारूरमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. लोकांना विश्वास आहे की, मोहन जगताप यांची निवड झाल्यास धारूरची विकास वेगाने पुढे जाईल.
सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी आव्हाण सुरेश बप्पा शेळके यांनी व्यक्त केली आहे.