धनंजय मुंडे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री, प्रकाश दादा सोळंके यांच्या प्रचारार्थ भव्य सभा आयोजित
माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार मा. प्रकाश (दादा) सुंदरराव सोळंके यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर २०२४ रोजी धनंजय मुंडे , कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री, बीड यांच्या नेतृत्वात भव्य जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या जाहिर सभेत धनंजय मुंडे साहेब आपल्या उपस्थितीत धारुर येथील देवदहिफळ येथे सायं ५:०० वाजता, आंबेवडगाव येथे सायं ६:३० वाजता आणि वडवणी येथे सायं ८:०० वाजता मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या माध्यमातून त्यांचा मुख्य उद्देश प्रकाश दादा सोळंके यांचे समर्थन करणे आणि त्यांच्या उमेदवारीसाठी अधिकाधिक मतदारांचा पाठिंबा मिळवणे आहे.
या सभेत माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंगभैय्या सोळंके यांचे उपस्थिती देखील अपेक्षित आहे.
धनंजय मुंडे यांचे भाषण या सभा मध्ये विशेष आकर्षण म्हणून राहील, जिथे ते राज्य सरकारच्या योजनांबद्दल चर्चा करणार असून, माजलगाव तालुक्यातील विकासकामांबाबत जनतेला माहिती देतील.
सर्व जनतेस या भव्य सभेत अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आह.,