अपक्ष उमेदवार प्रा. ईश्वर मुंडे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून स्थानिकांमध्ये आदर आणि प्रेम निर्माण केले, आगामी निवडणुकांसाठी पाठिंब्याची अपेक्षा वाढवली.
महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक माजलगाव मतदार संघात सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या धामधूमीत व्यस्त आहेत. परंतु, “आवड असली की सवड मिळते” या उक्तीचा प्रत्यय कल माजलगावातील अपक्ष उमेदवार प्रा. ईश्वर आनंदराव मुंडे गांजपूरकर यांनी दिला.
गुरुवार, १४ नोव्हेंबर २०२४ रोजी, रूई धारूर येथे श्री राजेंद्र काकडे आणि श्री महारूद्र भोसले यांच्या आत्या, स्व. गजराबाई मुकुंद हांडगे यांच्या प्रथम वर्ष श्राध्दा निमित्त प्रा. ईश्वर मुंडे यांनी एक महत्वपूर्ण किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे नियोजन एक महिन्यापूर्वीच केले गेले होते, त्यामुळे निवडणुकीच्या धामधूमीत त्यांना हा कार्यक्रम पार करण्याची संधी मिळणार का, याबद्दल संभ्रम होता.
परंतु, प्रा. ईश्वर मुंडे यांनी राजकारणाच्या फडातून बाहेर पडून युध्दक्षेत्रांतील त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांच्या गदारोळात त्यांनी सांप्रदायिक सेवेचा उच्चांक साधण्याचे ठरवले. संत तुकाराम महाराजांच्या “नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया” या अभंगावर त्यांनी गहन विचारांचं किर्तन सादर केले.
यावेळी प्रा. राम नांदूरे यांनी मृदंगाची साथ दिली, तर ह.भ.प. दत्तात्रय कदम महाराज, शिवाजी गायके महाराज, चंद्रहार गायकवाड, हनुमंत तिडके, धनराज सोळंके आणि सुमित भोसले यांनी गायनाची साथ केली.
प्रा. ईश्वर मुंडे यांच्या या सांप्रदायिक सेवेला प्राधान्य दिल्यास, मतदार संघातील लोकांच्या मनात त्यांच्या विषयी आदर आणि प्रेम वाढले आहे. त्यांच्या या कार्यामुळे आगामी निवडणुकांत त्यांच्या पाठिंब्याची अपेक्षा वाढीला लागली आहे.