रमेश आडसकर यांच्या प्रचारात एकतेचा संदेश, : – विजय शिनगारे
रमेश आडसकर यांच्या प्रचारात एकतेचा संदेश, : – विजय शिनगारे
“माजलगाव मतदार संघात सामाजिक एकत्रिततेची कास धरून उमेदवार रमेश आडसकर यांच्यावर भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे.”
माजलगाव मतदार संघातील अपक्ष उमेदवार रमेश रावजी आडसकर यांच्या प्रचाराची गती जोरात सुरू असून असरढव सर्कल येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले आहेत. प्रचाराच्या या सभेत अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांना भरभरून प्रेम आणि समर्थन मिळत आहे.
आंबा सहकारी कारखान्याचे संचालक श्री विजय शिनगारे यांनी उमेदवार रमेश आडसकर यांच्यावर सकारात्मक टिप्पणी केली. त्यांनी म्हटले, “जीवभावाची माणसं जेंव्हा कुणासोबत लढताना जिवाचं राण करतात, तेंव्हा नक्कीच एकमेकांची नाळ जुळलेली असते.” त्यांनी उपस्थित लोकांना आवाहन केले की, “सर्वांच्या मनात हाबाडा आहे… फक्त आपला चिन्ह – शेगडी आणि अनुक्रमांक – २८ सर्वांपर्यंत पोहोचवायला आपल्याला मेहनत घ्यायची आहे.”
श्री शिनगारे यांनी पुढे सांगितले की, “आज रात्री रुईमध्ये जमलेली ही गर्दी आणि जीवभावाची माणसं बघून, आपला लढा योग्य दिशेने असल्याची क्षणोक्षणी जाणीव होते.” त्यांचा संदेश स्पष्ट आहे, “आपल्याच माणसासाठी, आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊ या!”
रमेश आडसकर यांच्या प्रचारातील उत्साह आणि एकतेमुळे माजलगाव मतदार संघात नवीन उचांगी येत आहे. सामाजिक एकतेचा संदेश आणणारी ही ताकद स्थानिकांच्या मोठ्या पाठिंब्याला कारणीभूत ठरते.