माजलगाव विधानसभा निवडणुकीचा प्रचार तीव्र, धारूर शहरात महाविकास आघाडी, महायुती व अपक्ष उमेदवारांची सक्रियता, मतदारांमध्ये चर्चेला उधाण.

माजलगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारातील गती चांगलीच वाढली आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाच उमेदवारांच्या प्रचारात तीव्रता आली आहे. सध्या आठ दिवसांवर असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनदादा जगताप, महायुतीचे उमेदवार प्रकाश दादा सोळंके, तसेच अपक्ष उमेदवार रमेश रावजी आडसकर आणि माधव निर्मळ यांचे प्रचारकार्य धारूर शहरात जोरदारपणे सुरू आहे.

धारूर शहरामध्ये सर्व उमेदवार सक्रिय झालेले दिसून येत आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते आणि प्रमुख नेते गल्लोगल्लीत जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. विशेषतः महिला मंडळ्याही स्थानिक कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जात आहेत.

धारूर शहरात नेमकी कोणती उमेदवारी आणि किती प्रभावी आहे यावर चर्चा सुरू असताना महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर व माधव निर्मळ अधिक प्रतिसाद मिळतोय. या उमेदवारांचे बळ आणि लोकांच्या इच्छा-आकांक्षा यांचा प्रभाव प्रचारात मोठा दिसून येत आहे.

संपूर्ण माजलगाव मतदारसंघात तयारी जोरात असून, प्रत्येकजण आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात व्यस्त आहे. त्यामुळे येणाऱ्या मतदानात कोणता उमेदवार बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *