महायुतीचे उमेदवार प्रकाश दादा सोळंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ हनुमान मंदिरापासून हनुमान मंदिर पेठेत झालेल्या प्रचारात कार्यकर्त्या, ज्येष्ठ नेता आणि युवा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, धारूरच्या सर्वांगीण विकासाचा झाला जोरदार संकल्प.
धारूर: महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाश दादा सोळंके यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ किल्ले धारूर शहरातील हनुमान मंदिर पेठ विभागात करण्यात आला. या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला असून, वार्ड क्रमांक एक मधील हनुमान गल्ली, नाथा नगर, आझाद नगर, वैजनाथ नगर आणि अशोक नगर या भागात जोरदार प्रचार करण्यात आला.
या प्रचार फेरीत ज्येष्ठ नेत्या आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहकार्य लाभला. या निमित्ताने भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य नगराध्यक्ष स्वरुपसिंह हजारी साहेब, माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे साहेब, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव सिरसट, शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब कुरुंद, माजी नगरसेवक बाला भाऊ जाधव, राष्ट्रवादी गटनेते सुधिर शिनगारे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर सर, भाजप शहराध्यक्ष दत्ता भाऊ धोतरे, भाजी नगरसेवक बाबु भाई, बालाजी चव्हाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितिन भैय्या शिनगारे, भाजप गटनेते रोहित हजारी यांची उपस्थिती त्यात प्रमुख होती.
युवा नेत्यांनी देखील या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. युवा नेते सचिन जाधव, गौतम भैय्या चव्हाण, माजी नगरसेवक शेख फशोद्दीन, परमेश्वर शिनगारे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष मोहन भोसले, शिवसेना शहर प्रमुख अजित शिनगारे, तसेच युवा नेते सय्यद रजाक, गणेश सावंत, पप्पु शेटे आणि ज्ञानेश्वर शिंदे यावेळी उपस्थित होते.
सोशल मीडिया तालुकाध्यक्ष विश्वास शिनगारे, युवा नेते बाबुराव पुरदेकर, सरपंच राजेश सोनवणे, उपसरपंच सुरेश सावंत, ज्येष्ठ बाबुराव गायकवाड, अजित सिसरट, माणिक लोखंडे, समिर डफाली, माजी नगरसेवक सुरेश लोकरे, युवा नेते राजु भाई शेख आणि तोफिक सय्यद यांचेही या कार्यक्रमात योगदान होते.
या प्रचार फेरीत उमेदवार प्रकाश दादा सोळंके यांनी आपल्या योजनांची मांडणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. “आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आणि विश्वासातून धारूरचा सर्वांगीण विकास साधू,” असे त्यांनी यावेळी सांगितले. वर्धिष्णु प्रचाराची ही गती आगामी निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे.