धरून ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब नागरिकांसाठी व्यवस्थापन सुधारण्याची आवश्यकता

धारूर ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब नागरिकांना उपचार वेळेत आणि व्यवस्थित मिळावे यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शशांक वाघमारे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. रुग्णालयातून रेफरचे प्रमाण कमी करण्याबाबत आणि रुग्णांच्या अडचणी टाळण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या.

या संदर्भात बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर थोरात यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधण्यात आला. डॉक्टर वाघमारे यांनी सर्व पत्रकारांना आश्वासन दिले की, रुग्णांच्या बाबतीत कोणतीही गैरसोय होणार नाही, तसेच आरोग्यसेवांची गुणवत्ता वाढवली जाईल.

या बैठकीत प्रमुख पत्रकार नाथा ढगे, पोद्दार सतीष आणि इतर उपस्थित होते. गोरगरीब नागरिकांना उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवांचे स्तर उंचावण्यासाठी चर्चा व उपाययोजना अत्यंत आवश्यक असल्याचे पत्रकारांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *