माजलगाव विधानसभा निवडणूक: पप्पू सोळंके यांचा रमेश आडसकर यांना पाठिंबा
माजलगाव विधानसभा निवडणूक रणधुमाळ जोरात असून, निष्ठावंत कार्यकर्ता पप्पू सोळंके यांनी प्रकाश दादा सोळंके यांची साथ सोडत अपक्ष उमेदवार रमेश आडसकर साहेबांना पाठिंबा दिला आहे. सोळंके परिवाराने मागच्या 20 वर्षांपासून सामान्य जनतेची सेवा केली असून, या निर्णयामुळे मतदारसंघात चर्चेला वाव मिळाला आहे.
पप्पू सोळंके यांच्या या निर्णयामुळे माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणात हलचाल होण्याची शक्यता आहे. सोळंके कुटुंबाने स्थानिक राजकारणात एक महत्वाचा स्थान निर्माण केले आहे आणि पप्पूच्या या समर्थनामुळे आडसकर यांना आणखी बळ मिळालं आहे.
या निर्णयाबद्दल चर्चा होणार असल्याने मतदारसंघात पप्पू सोळंके यांचे राजकीय भविष्य आणि आडसकर यांचा विजय यावर चर्चा रंगेल हे नक्की आहे. मतदानाच्या प्रक्रियेत पप्पू सोळंके यांचा निर्णय एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो
आता पहायला हवे की माजलगाव विधानसभा निवडणुकीत या बदलाचे परिणाम कसे पहिलेत.