माजलगाव विधानसभा निवडणुक उमेदवार माधव तात्या निर्मळ यांचा साठे नगरमध्ये भव्य जनसंवाद स्थानिक जनतेने केलेल्या स्वागताने भारावलेले माधव तात्या निर्मळ, समस्यांच्या निरसनासाठी शाश्वत विकासाचे आश्वासन दिले.

आज माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने किल्ले धारूर शहरातील साठे नगर येथे आयोजित जनसंवाद दौऱ्यात माधव तात्या निर्मळचे भव्य स्वागत करण्यात आले. स्थानिक मतदार जनतेच्या उपस्थितीत तरुण मतदार बंधू आणि ज्येष्ठ नागरिक मंडळींनी मान-सन्मानाने स्वागत केले.

या संवाद साधण्यात माधव तात्या निर्मळनी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून उपस्थित जनतेच्या समस्यांबद्दल बोलले. त्यांनी स्पष्ट केले की, “मी नागरिकांच्या समस्यांसाठी सदैव तत्पर राहीन आणि त्या सोडविण्यासाठी माझी पूर्ण मेहनत असेल.” यावरून असे दिसून आले की, माजलगाव विधानसभा मतदारसंघात शाश्वत विकासासाठी बदलाची आवश्यकता जनतेच्या मनात ठरलेली आहे.

माधव तात्या निर्मळ पुढील पाच वर्षांसाठी शेतकऱ्यांना आणि बेरोजगारांना उद्योगनिर्मितीत सहभागी करून उद्योजक बनवण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “आपण आपले मतदान रूपी आशीर्वाद द्यावे, त्यामुळे मी मतदार संघातील गोर गरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळवू शकेन.” यावेळी त्यांनी जनतेला आश्वासन दिले की, “एकवेळ संधी दिली तर नक्कीच मतदारसंघात शाश्वत विकास घडवू शकेन.”

या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण युवक उपस्थीत होते. माधव तात्या निर्मळ यांच्या भाषणाने उपस्थितांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी त्यांच्याशी संवाद साधताना विविध समस्यांचे स्वरूप समजून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *