पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत धारूरमध्ये महायुतीच्या उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचारासाठी भव्य सभा
पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत धारूरमध्ये महायुतीच्या उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचारासाठी भव्य सभा
धारूर शहर आणि धारूर तालुक्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन : – नितीन शिनगारे
धारूर – माजलगाव मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार प्रकाश (दादा) सुंदरराव सोळंके यांच्या प्रचारार्थ रविवार, दि. १०. नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एक भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली
आहे. मा.आ.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे (आमदार तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा राष्ट्रीय सचिव भाजपा) भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य व नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
सभेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल समोर, हनुमान चौक, किल्ले धारूर येथे करण्यात आलं आहे. या सभेत स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन प्रकाश सोळंके यांच्या उमेदवारीसाठी समर्थन व्यक्त करावं, असं आवाहन अजित पवार राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे यांनी केलं आहे.