यशवंत अण्णा गायके यांची उमेदवारी: माजलगावच्या विकासासाठी नवा ठसा

माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने यशवंत अण्णा गायके यांनी समाजसेवा आणि राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका घेऊन जनतेसमोरील अनेक समस्या समजून घेण्याचा विचार केला आहे. त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा करताना सांगितले, “माझ्या माजलगाव मतदारसंघात रोजगाराची, शिक्षणाची मोठी अडचण आहे. आजकाल मुलांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बाहेर गेला पाहिजे. यावर उपाय म्हणून, मी या मतदारसंघात एक मेडिकल कॉलेज सुरू करणार आहे.”

गायके यांचा माजलगावच्या विविध भागांमध्ये गेलेला दौरा, त्यांना स्थानिकाच्या गरजांचा विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले, “ग्रामिण विकासासाठी पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण अशी मूलभूत सोयींवर अधिक लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. निवडून आल्यानंतर, मी या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना करेल.”

यशवंत गायके यांच्या योजनेमुळे आता ग्रामीण भागात विकासाच्या चांगल्या दिवसांची अपेक्षा आहे. जनतेच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे मतदारसंघात एक नवीन जागरूकता आणि आशा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *