माजलगाव विधानसभेत रणधुमाळी: मोहनदादा जगताप यांचा विजय निश्चित! धारूर शहरातील सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा; माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब खामकर
माजलगाव विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेत महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनदादा जगताप यांना धारूर शहरातील सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे, जगताप यांची विजेच्या दिशेने वाटचाल निश्चित असल्याचे जनतेत चर्चा सुरू आहे.
धारूरच्या प्रत्येक वार्डातून मोहन जगताप यांना पाठिंबा मिळत आहे, ज्यामुळे त्यांचा विजय आता आधीच निश्चित मानला जात आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब खामकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, “मोहनदादा जगताप यांचा विजय निश्चित आहे आणि त्यांना मोठ्या मताधिक्या मिळेल.”
या निवडणुकीतील मोहनदादा जगताप यांचा विजय हा केवळ त्यांचा नाही तर धारूर शहराचा विकासालाही गती देणारा ठरणार आहे.