माजलगाव मतदारसंघात रमेशराव आडसकर यांचा विजय निश्चित, डॉ. मयुर सावंत यांचा विश्वास

माजलगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारूर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आणि सर्व समाजात मानले जाणारे डॉ. मयुर सावंत यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली.

डॉ. सावंत म्हणाले, “गेल्या निवडणुकीत रमेशराव आडसकर यांनी लाखाच्या जवळ मतदान घेतले होते. जरी त्यांचा तोपर्यंत पराभव झाला असला, तरी त्यांनी मतदारसंघात कायम राहून मतदारांच्या सुख-दुखात भागीदार बनले आहेत. त्यामुळे त्यांच्यात नागरिकांशी भावनिक नाते निर्माण झाले आहे.”

त्यांच्या कामाचे कौतुक करताना डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले की विरोधी पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तसेच, सर्व जाती धर्मातील नागरिकांमध्ये रमेशराव आडसकर यांच्याबद्दल विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.

आडसकर यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना, डॉ. सावंत म्हणाले, “त्यांनी विविध मुद्यांवर आंदोलने केली आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठवला आहे, आणि कोरोना काळात नागरिकांसाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या आहेत. या सर्व बाबींमुळे रमेशराव आडसकर संपूर्ण मतदारसंघात घराघरात पोहचले आहेत आणि त्यांच्याविषयी जनतेत सहानुभूतीची लाट आहे.”

अशा परिस्थितीत, डॉ. मयुर सावंत यांनी विश्वास व्यक्त केला आहे की रमेशराव आडसकर अपक्ष आमदार म्हणून निवडून येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *