“रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) यांचे विकासासाठी दृढ वचन” “माजलगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आपला विश्वास व मतदान आवश्यक!”
उमेदवार रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) – माजलगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आपणा समोर आलो आहे. आपण मला विश्वासाने मतदान करून विजयी करावी, यासाठी मी आपणा सर्वांकडे मनःपूर्वक विनंती करतो.
आपल्या गावात होणाऱ्या अपेक्षित बदलांसाठी मी वचनबद्ध आहे. यामध्ये खालील गोष्टींवर विशेष लक्ष देणार आहे:
शेतीसाठी विदयुत पुरवठा: शेतकऱ्यांना 24 तास अखंडित वीजपुरवठा मिळवून देणार आणि 8 दिवसांच्या आत विनामूल्य रोहित्र (डीपी) उपलब्ध करणार.
सुरक्षित रस्ते: प्रत्येक गावाला जोडणारे उच्च दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देऊन, प्रवासाला सुरक्षितता आणि सोय प्रदान करणार.
शिक्षण : जिल्हा परिषद शाळेचा विकास करून दर्जेदार, ई लर्निंग शिक्षण देणार. प्रत्येक 3 किलोमीटरच्या अंतरात माध्यमिक शाळा उभारणार.
कृषी उत्पन्नाची सुरक्षितता: कापूस, सोयाबीन व इतर धान्य पिकांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार.
गावांचा सर्वांगीण विकास: गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात विकासाचे कार्य पोचवून, आपल्यासाठी प्रगतीच्या दरवाज्या उघडणारा होईन.
खड्डा-मुक्त प्रवास: गावांतर्गत व पांदण रस्त्यांचे सक्षमीकरण करणे आणि खड्डा मुक्त व सोयीस्कर प्रवासाची हमी देणे.
आरोग्य सेवा: मोफत आरोग्य सेवा देत आरोग्य सेवांचा विस्तार करून निरोगी व सामुदायिक आरोग्य सेवा प्रदान करणार.
सुलभ प्रवासी सेवा: प्रत्येक गावात अविरत एस.टी. बससेवा सुरू करणार, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ होईल.
वीज पुरवठा: गाव, वाडी, वस्ती व तांड्यांमध्ये 24 तास सिंगल फेज लाईट उपलब्ध करुन देणार.
आपल्या मतदानाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे, बुधवार, 20/11/2024 रोजी *शेगडी* या चिन्हासमोर बटन दाबून, मला प्रचंड बहुमताने विजयी करा.
उमेदवार: रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर)
निवडणुक चिन्ह: शेगडी अ. क्र.: 28
आपल्या प्रगतीसाठी आणि विकासाच्या मागे मी नेहमीच
तुमच्याबरोबर!