माधव निर्मळ यांचा माजलगावमध्ये भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा
माजलगाव, दि. 5 नोव्हेंबर: माजलगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांनी आज मंगळवार, 5 नोव्हेंबर रोजी माजलगाव येथील माँ वैष्णवी मंगल कार्यालयात भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करत प्रचाराचे रणशींग फुंकले.
माधव निर्मळ यांचे ओबीसी चेहरा म्हणून समर्पण लक्षात घेण्यात आले आहे आणि आज धारुर शहरापासून माजलगावपर्यंत भरगंत रॅली काढण्यात आली. या रोड शोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. गोपिनाथ मुंडे यांचे तसेच भाजप नेत्या पंकजाताई मुंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्या प्रतिमांसह निवडणूक निशाणी प्रेशर कुकर दिसून आल्या.
वैष्णवी मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना माधव निर्मळ यांनी यापुढे सदैव ताईसोबत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
पुढे बोलताना, प्रत्येक कार्यकर्त्यांने स्वतःला उमेदवार समजून एकजुटीने विजय मिळवून सर्वसामान्यांचा आवाज विधानभवनात पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास पी.टी. चव्हाण, कल्याण आबुज, बबनराव सरवदे, राजाभाऊ निर्मळ, सतीश बडे, बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
माधव निर्मळ यांच्या नेतृत्वात माजलगाव मतदारसंघात आगामी निवडणुकीत मोठा बदल घडवण्याची आशा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. कार्यक्रमामुळे माजलगावमध्ये राजकीय वातावरण तापले आहे