धारूर शहरात उमेदवारांचे कार्यकर्ते लागले कामाला महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांची चुरस; कार्यकर्ते घरोघरी प्रचार
दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी नामनिर्देशक काढण्याच्या दिवसानंतर माजलगांव विधानसभा मतदारसंघातील किल्ले धारूर शहरात उमेदवारांचे आणि पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. चिन्हांचे वाटप झाल्यानंतर कार्यकर्ते प्रत्येक घरोघरी जाऊन हॉटेल,टपरी,सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांची व पक्षांची माहिती देत आहेत.
या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांमध्ये महायुतीचे प्रकाश सोळंके, महाविकास आघाडीचे मोहन जगताप, अपक्ष उमेदवार रमेश आडसकर आणि अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांचा समावेश आहे. धारूर शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय असून, त्या त्या पक्षाच्या उमेदवारांना समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
शहरात सर्व उमेदवारांचा प्रभाव दिसून येत आहे, त्यामुळे मतदानाचे प्रमाण कोणाकडे वळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. धारूरमधील चौरंगी बहुरंगी चुरस पाहण्यास मिळणार आहे
धारूर शहरातील प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते हॉटेल,टपरी, सार्वजनिक ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याने, येणारे दिवस अधिक रोमांचक असतील, हे निश्चित.