धारूरमध्ये महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार “तालुका अध्यक्ष युवराज लगड यांच्या नेतृत्वात प्रत्येक घरोघरी जाऊन उमेदवारांची जनजागृती”

माजलगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनदादा जगताप यांना विजयी करण्यासाठी धारूर शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला गती दिली आहे. तालुका अध्यक्ष युवराज लगड यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते प्रत्येक घरोघरी जाऊन उमेदवारांचे जाहीरनामा सादर करत आहेत, तसेच कॉर्नर बैठका आणि हॉटेल् सार्वजनिक ठिकाणी आयोजित सभा करून जनजागृती वाढवत आहेत.

राष्ट्रवादी मावळ्यांनी या वेळी मोहनदादा जगताप यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

उपस्थित कार्यकर्ते सांगत आहेत की, “आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या समर्थित प्रचार करीत आहोत. मोहनदादा जगताप यांचे चिन्ह ‘तुतारी’ असल्याने, कोणत्याही स्थानिक कार्यक्रमांत तो दर्शवून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत.”

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याच्या दिशेने कार्यरत असून, आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यास तत्पर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *