प्रा. ईश्वर मुंडे: जनतेच्या आशा आणि विश्वासाचे प्रतीक सामान्य जनता हाच माझा पक्ष म्हणत प्रा.ईश्वर मुंडे यांचा जन संवाद दौरा सुरूच

दि. २ नोव्हेंबर २०२४ रोजी किल्ले धारूर येथे उच्च शिक्षित, प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले प्रा. ईश्वर आनंदराव मुंडे यांचा जन संवाद दौरा सुरू झाला. त्यांनी माजलगाव विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॅँग्रेस – शरदचंद्र पावर पक्षाकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती, परंतु पक्षाने त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहिर केली आहे.

प्रा. मुंडे हे “सामान्य जनता हाच आपला पक्ष” या तत्त्वावर विश्वास ठेवतात. निवडणूक अभियानाच्या सुरवातीस त्यांनी आपल्या आई-वडील आणि महापुरुषांचे दर्शन घेतल्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला.

दिपावली पाडव्याच्या शुभ मुहर्तावर धारूर तालुक्यातील प्रसिद्ध श्री बोंबल्या मारुती यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आसरडोह, उमरेवाडी, रूई, अंजनडोह, आसोला, गोपाळपूर, किल्ले धारूर, चिंचवण, बुरूजदरा आणि वडवणी शहरात जन संवाद दौरा सुरू केला.

प्रा. मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेत शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी पदावर काम केले आहे आणि १० वर्षांपासून समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा निर्धार केला आहे.

त्यांचे कार्यक्षेत्र अंतर्गत अनेक उपक्रम समाविष्ट आहेत, जसे की:
– सामान्य जनतेच्या सुख-दु:खात मदत. शासकीय कामांमध्ये समर्थन.नैसर्गिक आपत्तीत मदत.आरोग्य सेवा तसेच दवाखान्यातील रूग्ण व नातेवाईकांसाठी अन्न छत्र. अनाथ व निराधारांचे मोफत शिक्षण. युवकांना नोकरी व रोजगार मार्गदर्शन.
दुष्काळात पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने काम. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलने.धारूर येथील जन संपर्क कार्यालयाद्वारे सेवेसाठी दृढपणा.

या कार्यामुळे प्रा. मुंडे यांना जनतेचा पाठींबा व आशिर्वाद आहे. त्यांनी जनतेसमोर एक नवा आशावाद व्यक्त करून माजलगाव विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा विश्वास दर्शवला आणि सुजान मतदारांच्या समर्थनाची विनंती केली. त्यांच्या दौऱ्यास जनतेचा चांगला पाठींबा मिळत असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *