धारूर एसटी आगार व 136 इको बटालीयन यांच्या संयुक्त वृक्षारोपण झाडांच्या सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्यात आल्या

धारूर येथील एसटी बसस्थानक आवारात 136 इको बटालीय व धारूर एसटी आगाराच्या वतीने वृक्षारोपण मोहिम पार पडली. या उपक्रमात झाडांच्या सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्याचे कार्य हाती घेतले गेले आहे, ज्यामुळे बसस्थानकाच्या परिसराचे सौंदर्य वाढणार आहे.

धारूर एसटी आगाराच्या वतीने 136 इको बटालीयनच्या सहकार्याने बसस्थानकाच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने लोखंडी जाळ्या तयार करून झाडांचे संरक्षण केले आहे. अवर्षण काळात झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आगार प्रमुख नवनाथ चौरे यांनी इंधन विहीर घेण्याची योजना तयार केली आहे.
आगार प्रमुख नवनाथ चौरे म्हणाले, “या वृक्षारोपणामुळे बसस्थानकाच्या परीसराचे सौंदर्य वाढेल, आणि स्थानिक नागरिकांना पर्यावरणाबद्दल जागरूकता येईल.”

या वृक्षारोपन वेळी लेंफ्टनन कर्नल अमित प्रभू नायब सुभेदार बि एस दिवेकर, नायक विजय जाधव, संदीप ढोबाळन, उमाजी खावडे, एस टि आगाराचे आगार प्रमुख नवनाथ चौरे, सहायक आगार प्रमुख भारत कोमटवार, कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *