संघटनात्मक बांधणीतुन समाजाचे एकत्रीकरण कायमच हिताचे ठरते – नंदकुमार गादेवार पुरुष महासभेच्या जिल्हाध्यक्ष पदी सूर्यकांत महाजन तर महिला महासभेच्या जिल्हाध्यक्षा पदी सौ सुप्रिया अनिल चिद्रवार

किल्ले धारूर :- बीड जिल्हा आर्यवैश्य महासभेचे काम नेहमीच कौतुकास्पद राहिले आहे त्यांचा आदर्श ईतर जिल्ह्यातील महासभेच्या टीमने घेण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी व्यक्त केले बीड जिल्हा आर्यवैश्य महासभेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी पदग्रहण व गुणवंतांच्या सत्कार व काशी अन्नसत्रमच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते

बीड येथील हॉटेल नीलकमल येथे आयोजित कार्यक्रमास सत्कारमूर्ती म्हणून काशी अन्नसत्रमचे नंदकुमार गादेवार , विलास बच्चू , देवकी व्यंकटेश्वरलु , बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार , संघटक प्रदीप कोकडवार , सौ माधुरीताई कोले , सौ बबिता आष्टीकर , राज्यकार्यकारणी सदस्य श्री .विकास डुबे , अनिल चिद्रवार , अजित भावठणकर , अभय कोकड , यांची प्रमुख उपस्थिती होती

वासवीमाता व रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व गणेश वंदनेसह राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . पुरुष महासभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सूर्यकांत महाजन , सचिव म्हणून अजय रुद्रवार , कोषाध्यक्ष म्हणून बालाजी बासटवार , कार्याध्यक्ष म्हणून वैभव झरकर , यांची तर महिला महासभा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा म्हणून सौ. सुप्रिया अनिल चिद्रवार , सचिव सौ. मनीषा प्रदीप झरकर , कोषाध्यक्ष सौ. मेघाताई सुनील डुबे , कार्याध्यक्ष सौ. सोनाली सुमित रुद्रवार यांच्यासह नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पुरुष सदस्यांना समन्वयक अभय कोकड यांनी तर महिला सदस्यांना राष्ट्रीय अध्यक्षा सौ माधुरी कोले यांनी शपथ दिली तसेच यावेळी दहावी , बारावी यासह स्पर्धा परीक्षा व ईतर क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला

पुढे बोलताना गादेवार म्हणाले कि ; काशी अन्नसत्रमचे कोषाध्यक्ष पद मिळेल हि अपेक्षा आपण बाळगली न्हवती परंतु अन्नसत्रमच्या सर्व सभासद बांधवानी आपल्यावर विश्वास दाखवत आपली बिनविरोध निवड केल्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत. तसेच लवकरच हैद्राबाद येथे काशीअन्नसत्रमचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलवून दाखवला . यावेळी विलास बच्चू व देवकी व्यंकटेश्वरलु यांची देखील समयोचित भाषणे झाली यात त्यांनी महाराष्ट्रातील कार्यक्रम हे नेहमीच चांगले व शिस्तबद्ध पद्धतीने होतात याचे नेहमीच आपणास कौतुक असल्याचे सांगत काशी अन्नसत्रम नेहमीच महाराष्ट्रातील समाजबांधवांना मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळते अध्यक्ष सुमित रुद्रवार यांनी केले तर आभार अजय रुद्रवार यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *