सौ. प्रियंका गणेश सावंत यांना मिळाला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता कृषी भुषण पुरस्कार
धारूर, बीड महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या *राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता कृषी भुषण पुरस्काराने* सौ. प्रियंका गणेश सावंत यांना महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, कृषी मंत्री मा. धनंजयजी मुंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री.गणेश धोंडीबा सावंत आणि सौ. प्रियंका गणेश सावंत ह्या मठ्ठ गल्ली कसबा विभाग येथील रहिवासी असून सौ. प्रियंका वयाचा ३२ वर्षांचा असलेला हा पुरस्कार त्यांच्या कष्ट, निष्ठा आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामागील जिद्द यांद्वारे साधला आहे. प्रियंकाच्या पतीचे नाव गणेश धोंडीबा सावंत असून त्यांचा वय ३६ वर्ष आहे. प्रियंकाकडे दोन मुले आहेत – वेदांत (वय ७ वर्षे) आणि जान्हवी (वय १० वर्षे).
प्रियंकाने लहानपणापासून शेतीत रुची ठेवली असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती आपल्या शेतीत बदल करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. धारुर सारख्या पावसाच्या अनिश्तता असलेल्या ठिकाणी निवास करत असताना, प्रियंकाने कृषि विभागाच्या योजना जसे की शेततळे योजना, पॉलिहाऊस आणि पॉलिहाऊस मधील जरबेरा लागवड यांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ती शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ करण्यास सक्षम झाली आहे.
प्रियंका यांनी पाणलोट विकास संवादत तंत्रज्ञानाचा उपयोग करून रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीला यशस्वीरित्या रुजवले, ज्यामुळे पाण्याचा समुचित वापर होतो. ठिबक सिंचनाच्या उपयोगामुळे तिच्या ०.३१४ हेक्टर क्षेत्रावर शेती व्यवस्थापनात सुधारणा झाली आहे, ज्यामुळे पाण्याची बचत वाढली आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही मिळाले आहे, ज्यामध्ये कृषी सहाय्यक श्री. महेश बसर्गी, कृषी पर्यवेक्षक श्री. चैतन्य जमादार, मंडळ कृषी अधिकारी श्री. समाधान वाघमोडे आणि तालुका कृषी अधिकारी श्री. शरद शिनगारे यांचा समावेश आहे.
सौ. प्रियंका गणेश सावंत यांचा पुरस्कार हा त्यांच्या मेहनतीचे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीला समर्पित असलेल्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. त्यांच्या यशाने इतर महिलांना प्रेरणा दिली असून, यामुळे कृषी क्षेत्रात महिलांच्या योगदानाच्या महत्त्वाकडे लक्ष वेधले आहे. भविष्यात त्यांचे कार्य अधिकाधिक पोसक होईल, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.
सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्ष होत आहे.