किल्ले धारूरमध्ये महाआरोग्य शिबिरात मतिमंद मुलांची आरोग्य तपासणी, आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा
किल्ले धारूर येथे निवासी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात मतिमंद मुल आणि मुलींच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार तथा भावी मुख्यमंत्री मा. रोहित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन गणेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शिबिरात उपस्थित राहिलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. फरवेज शेख, डॉ. अरविंद निक्ते यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. शिबीरात मतिमंद मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक शिफारशी देण्यात आल्या.
तपासणीनंतर, मुलांना आरोग्य सुधारण्यासाठी खाऊ वितरण करण्यात आले. उपस्थितांचे कौतुक करताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष गणेश थोरात म्हणाले, “या शिबिराद्वारे आम्ही समाजातील या मुलांसाठी एक सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे.”
कार्यक्रमात निलेश ढगे, स्वप्नील धनवडे, तेजस चव्हाण, बाळू थोरात, सुधीर गिरी, बाळासाहेब चौरे, शुभम चाळक, विकास तिकडे आणि विष्णू मैंद यांच्यासह अनेक शिक्षक आणि ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.