आवरगाव ग्रामपंचायतीने विशेष राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांच्या अंतर्गत आदर्श सांडपाणी व्यवस्थापन व समुदाय विकासासाठी मान्यता.
छत्रपती संभाजी नगर, 23 सप्टेंबर 2024: महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले. या समारंभाचे अध्यक्षस्थान मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता, भूषित करत होते. हा कार्यक्रम संत एकनाथ रंगमंदिर, नवीन उस्मानपुरा, पन्नालाल नगर, छत्रपती संभाजी नगर येथे झाला.
या सोहळ्यात 2019-20 या वर्षातील विशेष राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. आवरगाव, तालुका धारूर, जिल्हा बीड येथील ग्रामपंचायतीने विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून त्या माध्यमातून स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्कार प्राप्त केला आहे. या ग्रामपंचायतीने बंदिस्त गटार प्रणालीद्वारे प्रभावी सांडपाणी व्यवस्थापन, पाऊस पाणी संकलन, जांभूळ प्रकल्प, 5000 पेक्षा जास्त वृक्ष लागवड, ज्येष्ठ नागरिकांसाठी कक्ष स्थापन केले आहे तसेच महिलांसाठी सभागृह उभारले आहे.
2019-20 या वर्षातील विशेष राज्यस्तरीय पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते स्वीकार करताना आवरगावचे सरपंच अमोल जगताप, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, युवक मंडळ आणि महिलांच्या सदस्य उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे आवरगाव ग्रामपंचायत, अमोल जगताप सरपंच,गावकऱ्यांचे यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.