ग्राहक संरक्षण कायद्यावर व्याख्यान आयोजित राजमाता जिजाऊ महाविद्यालयात प्रोफेसर डॉ. ईश्वर छानवाल यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती, ग्राहकाच्या हक्कांची जाणीव साधली.

किल्ले धारूर – 17 सप्टेंबर
येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ग्राहक संरक्षण कायदा या विषयावरील प्रोफेसर डॉ. ईश्वर छानवाल यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून ग्राहक संरक्षण कायदा समजावून सांगताना वस्तू विनिमय कायदा 1930 मांडला गेला. त्यानंतर ऑगस्ट २००६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा आणला व 1920 पासून कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे विक्रेत्याकडून ग्राहकावर होणारा अन्याय व ग्राहकाचे संरक्षण, वस्तूची सुरक्षितता, ग्राहक समाधान व वस्तू निवड करण्याचा अधिकार मिळाला. तसेच प्रचलित नवीन ग्राहक संरक्षण कायद्यांची माहिती दिली. लवाद आयोग राज्य, जिल्हा व राष्ट्रीय पातळीवरून होणारे कायद्यान्वये संवर्धन याची प्रक्रिया समजावून दिली. अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी या व्याख्यानाच्या माध्यमातून सर्वांना ग्राहक संरक्षण आणि ग्राहकाचे हक्क व अधिकार माहिती झाले. कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर ग्राहकाला असलेले अधिकार माहिती नसतात. त्यामुळे आपण वस्तू निकामी झाल्यावर तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र ग्राहक संरक्षण कायद्यान्वये आपणास दाद मागता येते. त्यामुळे या कायद्याचा वापर प्रत्येकाने करावा असे सांगितले. याप्रसंगी विचार मंचावर महाविद्यालय विकास समिती निमंत्रित सदस्य डॉ. राम शिनगारे, श्री. इंद्रजीत जाधव, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, कार्यक्रमाधिकारी प्रा. बालासाहेब जोगदंड यांची उपस्थिती होती. व्याख्यानासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग विद्यार्थी व स्वयंसेवकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. बी. जाधव यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. विजयकुमार कुंभारे यांनी मानले.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *