किल्ले धारूरमध्ये विजयादशमी उत्सवासाठी रावण दहन समितीची निवड
किल्ले धारूर रावण दहन समितीने यावर्षीच्या विजयादशमी उत्सवासाठी नवीन कार्यकारिणीची निवड केली आहे. श्रीनिवास शिनगारे यांना अध्यक्षपदी, हरिभाऊ मोरे यांना उपाध्यक्षपदी, आणि धनंजय शिनगारे यांना सचिवपदी एकमताने नियुक्त करण्यात आले आहे.
यावर्षीही 2024 विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहाने ऐतिहासिक किल्ले धारूर मधील दसरा मैदानावर साजरा केला जाणार आहे. रावण दहन समितीने याबाबतीत एक महत्त्वाची बैठक धारूर कसबा विभागतील तुळजा भवानी मंदिरात आयोजित केली होती. या बैठकीत कार्यकारिणीची निवड सर्वमान्यपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मुकुंद भोसले बळी शेळके किरण जाधव बालाजी शिनगारे निलेश शिंनगारे मनोज शिंनगारे विजय शेळके प्रथमेश लोखंडे युवराज शिंदे अविभाऊ उकंडे आदिनाथ गोतावळे यासह असंख्य श्री रामभक्त उपस्थित होते.
आयोजकांनी यावर्षी ४१ फूट उंच रावणाची मूळ जाळून त्यासोबत भव्य आतिशबाजी साजरी केली जात असल्याचे जाहीर केले आहे.
या उत्सवाचा ऐतिहासिक संदर्भ आणि सांस्कृतिक महत्त्व यामुळे या घटनेला विशेष स्थान आहे. धारुरच्या स्थानिक नागरिकांसाठी आणि रामभक्तांसाठी हा एक महत्त्वाचा व आनंददायी कार्यक्रम आहे.