किल्ले धारूर येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदाकडून चोख व्यवस्था पोलीस प्रशासन विद्युत वितरण विभाग सज्ज
किल्ले धारूर शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगरपरिषद किल्ले धारूरच्या वतीने कासार तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक व्यवस्थांची तयारी करण्यात आलेली आहे.
गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या काळात भक्तांनी आणलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन कासार तलाव येथे करण्यात येणार आहे. यावेळी खास सुरक्षा आणि सोयीसुविधा यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी ठिकाण म्हणजे कासार तलाव, जो किल्ले धारूर शहराच्या मध्यभागी स्थित आहे. या विसर्जनाची प्रक्रिया गणेश उत्सवानंतर साधारणतः तारीख १६, १७ सप्टेंबर २०२४आहे. या कार्यक्रमाचे आयोजन किल्ले धारूर महेश गायकवाड मुख्याधिकारी नगरपरिषद आणि पोलीस निरीक्षक वाघमोडे पोलीस प्रशासन जोगदंड अभियंता विद्युत विभाग नेतृत्वाखाली सर्व कार्यवाही पार पडेल. विसर्जन ठिकाणी लाईट्सची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आलेली आहे. नगरपरिषद व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पॅन्डोल तसेच अग्निशामक व्यवस्थेसाठी बोट तैनात करण्यात आले आहे. नगरपरिषद कर्मचार्यांची उपस्थिती विसर्जन प्रक्रियेत मदत करण्यासाठी कायम ठेवली आहे.गणेश विसर्जनासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे भक्तांना विसर्जन करताना कुठलीही अडचण भासणार नाही. भक्तांना नम्रपणे सांगण्यात आले आहे की विसर्जनाच्या वेळी पूजा साहित्य जसे कि हार, फुले, नारळ इत्यादी साहित्य पाण्यात न टाकता नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडे द्यावे.