माजलगाव विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
धारूर, माजलगांव, वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके मुसळधार पाण्याने पूर्णपणे नष्ट; तुरंत अनुदान आणि कर्ज माफीची आवश्यकता निवेदन इंजी. सादेक बाबामियाँ इनामदार (मराठवाडा अध्यक्ष) शेतकरी यांनी तहसीलदार यांना देण्यात आले.
माजलगाव विधानसभा मतदार संघातील धारूर, माजलगांव आणि वडवणी तालुक्यात 31 ऑगस्ट 2024 पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी तात्काळ ई-पिक पाहणीची अट रद्द करण्याची, 100% पिक विमा मंजुर करण्याची, तसेच प्रति हेक्टरी 50,000 रुपये अनुदान आणि कर्ज माफीची मागणी केली आहे. निवेदन इंजी. सादेक बाबामियाँ इनामदार (मराठवाडा अध्यक्ष) व शेतकरी यांनी निवेदन तहसीलदार यांना सादर केले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उपाययोजना तात्काळ करण्यात यावेत.