अंजनडोहमध्ये डेंग्युचा प्रादुर्भाव; विद्यार्थ्याचा मृत्यू ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; उपाययोजनांची मागणी
धारूर तालुक्यातील अंजनडोह येथे डेंग्युच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १४ वर्षांचा शालेय विद्यार्थी प्रेम भानूदास तुपसागर याचे निधन 27 ऑगस्ट 2024 रोजी झाले. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याची मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व संताप आहे. डेंग्युच्या आणखी रुग्णांची संख्या वाढत आहे, परंतु ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
आठवीच्या वर्गात शिकणारा १४ वर्षीय प्रेम भानुदास तूपसागर याचे दोन दिवसांपूर्वी डेंग्यूच्या आजाराने निधन झाले. तो अबाजोगाई येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यात होता. या घटनेने गावात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून डेंग्यूच्या कारणाने स्थानिक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. या शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि नागरिक तात्काळ प्रभावी उपाययोजनांची मागणी करत आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी अंजनडोह येथे आरोग्य विभागाने डेंग्यूच्या प्रादुर्भावाविरुद्ध उपाययोजना व जनजागृती सुरू केली आहे. शालेय विद्यार्थ्याच्या डेंग्यूने झालेल्या निधनानंतर आरोग्य विभाग घराघरात जाऊन जनजागृती करत आहे. नागरीकांना डेंग्यूचा प्रतिबंध घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. लोमटे यांनी केले आहे.