ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सण पोलीस व सैन्य अधिकाऱ्यांसोबत साजरा

किल्ले धारूर तालुक्यातील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयातील स्काऊट व गाईड पथकातील बाल विद्यार्थ्यांनी दिंनाक 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला. त्यांनी किल्ले धारूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या पोलीस बांधवां सोबत व 136 बी इको भारतीय बटालियनच्या सैनिकांसोबत एकत्र येऊन या सणाची साजरा केली.
या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. देविदास वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाविषयी विस्तृत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. या कार्यक्रमास पोलीस स्टेशन किल्ले धारूर व इको बटालियन 136 बी मधील सर्व कर्मचारी व मोठी संख्या असलेले विद्यार्थी उपस्थित होते. ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जपवणूक व्हावी, तसेच विविध सण व उत्सवांची ओळख व्हावी या हेतूने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. रक्षाबंधन सण हा त्यापैकीच एक कार्यक्रम होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री सय्यद शाकेर , ज्येष्ठ पत्रकार श्री अनिल महाजन,श्री शाहिद शेख सर, श्री. मुंजाराम निरडे सर पोलीस स्टेशन किल्ले धारूर व इको बटालियन 136 बी सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *