किल्ले धारूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळराजे रामराव आवारे पाटील व सहकाऱ्यांचा नागरी सत्कार
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त, 15 ऑगस्ट 2024 रोजी अमर जवान चौक, छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर प्रांगणात धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळराजे रामराव आवारे पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला.
किल्ले धारूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. यामुळे धारूरकरांचे खूप वर्षांचे स्वप्न साकार झाले.
श्री. बाळराजे रामराव आवारे पाटील धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा पुतळा स्थापित करण्यात आला. यांचे योगदान बद्दल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला.
अमर जवान माजी सैनिक संघटनेचे संस्थापक विठ्ठलदादा शिनगारे, माजी सैनिक व किल्ले धारूर येथील नागरिकांनी धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळराजे रामराव आवारे पाटील आणि सहकारी यांचा हार, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक,देशभक्त, शिवप्रेमी, नागरिक, यशोदीप इंग्लिश स्कूलची विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.