राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये हर घर तिरंगा अभियान अंतर्गत ध्वजारोहण संपन्न
किल्ले धारूर दिनांक 14 ऑगस्ट रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा -2024 अभियान अंतर्गत देशभर दिनांक 13, 14 व 15 ऑगस्ट या कालावधीत ध्वजारोहण करण्यात येत आहे. या निमित्ताने महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. जाधव यांनी उपस्थितांना हर घर तिरंगा अभियान -2024 अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या सूचनेनुसार नशा मुक्त भारत यासाठी उपस्थितांना शपथ दिली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅली मध्ये सहभागी होऊन धारूर शहर व परिसरातील नागरिकांना हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जाणीव जागृती केली. ध्वजारोहण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, कार्यक्रमाधिकारी डॉ. विजयकुमार कुंभारे, कार्यक्रमाधिकारी प्रा. बालासाहेब जोगदंड, क्रीडा शिक्षक श्री. शिनगारे यांबरोबरच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.