किल्ले धारूर चे सुपुत्र संतोषसिंग रहेकवाल यांची सुभेदार मेजर पदी पदोन्नती
किल्ले धारूर चे सुपुत्र संतोषसिंग भारतसिंग रहेकवाल यांची नुकतीच सुभेदार मेजर पदी पदोन्नती झाली आहे. या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
संतोषसिंग भारतसिंग रहेकवाल हे आदर्श क्रीडा शिक्षक भारतसिंग जयपालसिंह रहेकवाल यांचे सुपुत्र असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा वकीलवाडी केज येथे झालेले आसून माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज येथे झालेले होते.
पुढे त्यांची भारतीय सैन्य अंतर्गत बॅाईज स्पोर्ट्स कंपनी पुणे अंतर्गत रोइंग नौकायन क्रीडा प्रकारासाठी निवड झाली.या क्रीडा प्रकारात त्यांना पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक मिळाले व दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.
नंतर क्रीडा कोठयातून भारतीय सैन्यदलात त्यांची भरती झाली.२५ वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची आता सुभेदार मेजर पदी पदोन्नती झाली आहे.
पदोन्नती बाबतचे सन्मानाचे अशोक स्तंभ चिन्ह कर्नल विशाल पाठक साहेब व वडील भारतसिंग रहेकवाल यांच्या शुभ हस्ते व आई सौ.शकुंतला व पत्नी सौ.पुजा यांच्या सह कुटुंबीयांचे समक्ष लावून बॅांम्बे इंजिनीअरींग ग्रूप पुणे येथे त्यांना सन्मानित करण्यात आले.
पदोन्नती नंतर माध्यमांशी बोलताना सुभेदार मेजर संतोषसिंग रहेकवाल म्हणाले की, मला माझे वडील आदर्श क्रीडा शिक्षक भारतसिंग रहेकवाल,प्रा.हनुमंत भोसले,प्रा.ईश्वर मुंडे यांचे मार्गदर्शन लाभलेले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असून शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांनी प्रमाणीकपणे प्रयत्न केले तर ग्रामीण विद्यार्थी नक्कीच सर्वच क्षेत्रात यशस्वी होतात.