स्वातंत्र्यसेनानी कै. रामरावजी आवरगावकर व क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्ताने अभिवादन
किल्ले धारूर 3 ऑगस्ट रोजी राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये दि 03 ऑगष्ट 2024 रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी कै. रामरावजी आवरगावकर साहेब व स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे व श्री. आबासाहेब शिंदे यांनी प्रतिमांचे पूजन केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर कार्यालय अधीक्षक श्री. केशव भोंडवे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विनायक कापावार, सदस्य प्रा. नागोराव वाघमारे, डॉ. विजयकुमार कुंभारे, डॉ. नितीन कुंभार यांबरोबरच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांचे उपस्थिती मोठ्या संख्येने होती.